"उष:प्रभा कला केंद्र"...
लहानपणी शाळेतून येताना गणपती शाळेबाहेर उभं राहून गणपतीची मूर्ती कशी घडत जाते हे बघायला मला खूप आवडायचं. त्यामुळे कलाक्षेत्रातच पदवीधर झाल्यावर आपणही बाप्पा घडवावा असं वाटू लागलं. पण गणेशोत्सवात गणपती विसर्जनानंतरचं दृश्य पाहायला जिवावर यायचं. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच बनवाव्यात अशी गाठ मनाशी बांधली होती. शाडूच्या मातीची मूर्ती बनवली जाते हे माहीत होतं, पण ती तितकीच जडही असते हेही लक्षात होतं.
तेव्हाच नेटवर काही कागदी लगद्यापासून गणपती बनवतानाचे व्हिडियो पाहिले. त्यावरुन प्रेरणा घेऊन गणपती बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि बाप्पाने साथ दिली.
कागदी लगद्यापासून गणपती बनवण्याची क्रिया थोडी जास्त मेहनीतीची आहे, पण समाधान देणारी आहे.